Tuesday, 2 December 2014

पाठीवरचे ओझे

शाळेत जाणाऱ्या एका मुलाचे मनोगत
------------------------------------------------------------------------------
शाळेत निघालो घेउन 
इवल्याशा  पाठीवर ओझे 
रमतगमत जायचा आनंद 
मनातल्या मनातच विझे 

एवढ्याशा मेंदूत या 
साठवायचे नाना तऱ्हेचे विषय 
बऱ्याच वेळा उमगत नाही 
यामधील आशय

शाळेमधूनि आल्यावरती 
मी असतो व्यस्त 
विविध क्लासेस ना जाऊन 
जीव होई त्रस्त 

सुट्टीच्या दिवशीच असतो 
काहीसा मोकळा वेळ 
पण एकूणच वेळापत्रकाचा 
काही बसत नाही मेळ 

खेळाशी जणू तुटले 
                 आहे नाते 
मैदानाकडे जाणारी वाट 
आता दुसरीकडेच जाते 

सुट्ट्यांमध्ये येतो विविध 
शिबिरांना उत
एकडे की तिकडे यामध्ये 
होते मात्र मनाची गुतागुत 

शिक्षण हाच असतो ना 
जीवनाचा अमुल्य ठेवा? 
शाळेत न जाणाऱ्यांकडे बघून 
वाटत आहे मला हेवा 

पावलापावलावर असते एकाची 
                     दुसऱ्याशी तुलना 
या जीवघेण्या स्पर्धेत असेल का माझी गणना ?

घरट्यातून गरूडझेप घेण्याचे 
स्वप्न बाळगुन आहे मी उराशी 
भोवताली पाहुन  वाटते 
पंख छाटून जातील एका फटक्यानिशी 

सर्वजण म्हणतात बालपण देगा देवा 
            पण आता वाटते 
हे बालपण एकदाचे संपव रे देवा 




No comments:

Post a Comment