मूळा-मूठा च्या संगमावरी
वसले आहे एक नगर
विदयेचे आणि संस्कृतीचे
आहे हे एक आगर
श्रीगणेश उत्सवाचा
झाला येथून प्रारंभ
अशा अनेक सुंदर गोष्टींचा
होतो येथून आरंभ
शनिवार वाडा उभा आहे
मोठ्या दिमाखाने
आपल्याच सोनेरी इतिहासाची
वाचत आहे पाने
बुधवार पेठी वसला आहे
श्रीमंत दगडू शेठ हलवाई
दरवर्षी देखाव्यात असते
एक नवलाई
प्रसिद्ध आहेत येथील दुकानांवरील
विचित्र फलक
तरीपण प्रत्येकजण उत्सुक आहे
याची दाखवावयास झलक
दिवसागणिक वाढत आहे येथील रहदारी
दुचाकीस्वार दाखवितात त्यातूनच आपली अदाकारी
आरटीओ च्या आधारे कोड आहे MH बारा
नशीब म्हणजे पुण्यात कुणाचे वाजत नाही तीनतेरा
कळत नाही आता या फुगलेल्या नगराची वेस
व्यवस्था बघताना शासनाच्या तोंडाला येतो आता फेस
एकविसाव्या शतकातील आहे
हे एक IT डेस्टीनेशन
परिपूर्ण महानगर बनण्याचे
दिसते आहे मिशन
चिमण्या गणपती, उपाशी विठ्ठल
भांग्या मारुती, पोटसुळ्या मारुती
अशी मंदिरांची विचित्र नावे असणारे
अनेक थोर कलावंताचे
साप्ताहिक वारांच्या पेठांचे
खास पुणेरी तिरकस पणाचा
ज्वाज्वल्य अभिमान बाळगण्याऱ्या लोकांचे
रुचकर अन्नाच्या भरपूर खानावाळी असणारे
पारंपारिक मराठमोळी संस्कृती जपणारे
इतक्या सुंदर गोष्टीनी नटलेले
हे पेशव्यांचे पुणे
म्हणूनच म्हणतात की काय
पुणे तेथे काय उणे?
No comments:
Post a Comment