सूर्याचे असते का कधी आरक्षण
सगळ्यांना प्रकाश देताना
झाडे करतात कधी
वाटसरूंना सावली देताना
सोशल मीडिया वर असते का
एकमेकांचे मित्र बनताना
सीमेवरील जवानांमध्ये असते का
धैर्याने शत्रूशी लढताना
रानात पेटलेल्या वणव्यामध्ये असते का
मार्गी येईल ते भक्षण करताना
पुराचे पाणी करते का कमी अधिक
भोवतालचे वाहून नेताना
मग आपण का बाळगली आहे
ही आरक्षणाची अडगळ
मानवी जीवन जगताना?
कशाला पाहिजे हा जातीचा शिक्का
जिथे तिथे प्रवेश आणि बढती देताना
प्रगतीची गाडी किती अडखळते
हे आरक्षणाचे खड्डे ओलांडताना
आर्थिक बाबींवरच असावे आरक्षण
देशाची प्रगती साधताना
होईल का सुधारणा कोणा सरकारकडून
सत्तेचे अवघड सुकाणू हाकताना
बघुयात कोण घालतय लगाम
या बेफाम घोडयांना
सगळ्यांना प्रकाश देताना
झाडे करतात कधी
वाटसरूंना सावली देताना
सोशल मीडिया वर असते का
एकमेकांचे मित्र बनताना
सीमेवरील जवानांमध्ये असते का
धैर्याने शत्रूशी लढताना
रानात पेटलेल्या वणव्यामध्ये असते का
मार्गी येईल ते भक्षण करताना
पुराचे पाणी करते का कमी अधिक
भोवतालचे वाहून नेताना
मग आपण का बाळगली आहे
ही आरक्षणाची अडगळ
मानवी जीवन जगताना?
कशाला पाहिजे हा जातीचा शिक्का
जिथे तिथे प्रवेश आणि बढती देताना
प्रगतीची गाडी किती अडखळते
हे आरक्षणाचे खड्डे ओलांडताना
आर्थिक बाबींवरच असावे आरक्षण
देशाची प्रगती साधताना
होईल का सुधारणा कोणा सरकारकडून
सत्तेचे अवघड सुकाणू हाकताना
बघुयात कोण घालतय लगाम
या बेफाम घोडयांना