Saturday 25 November 2017

on Stampede in Mumbai at Elphiston road railway bridge

एक साधासा पूल
बनला मृत्यूचा सापळा
पायाभूत सुविधांच्या पेपरमध्ये
मिळाला पुन्हा भोपळा

कुणाला लागली आहे
बुलेट ट्रेनची आस
तर इथे तिच्यापेक्षा अधिक
वेगाने कोंडले जातात किती श्वास

घडले अगदी अचानक
नव्हते कुणाच्या ध्यानीमनी
पण काही झाले कि सरकार
आपलं टीकेचे धनी

गर्दीत गर्दी करायची
आपली सवयच खास
यातूनच काही जणांच्या
गळ्याभोवती येतो फास

कोणी म्हणे ती वेळ
आणि आला होता काळ
तर काही राजकारणींच्या मते
काहीतरी शिजते आहे डाळ

विरोधी पक्ष सरकारकडे
मागत आहेत खुलासा
त्याने का मिळणार
आहे मृतांच्या नातेवाईकांना
दिलासा?

पायाभूत सुविधांचे कसे
करावे मोजमाप
वाढत जाणारी गर्दी
हाच  डोक्याला खरा ताप

शहरातील येणाऱ्या लोंढ्याना
थोपविणारा कोणी नाही मायबाप
मोकाट गर्दीला मग
कसा बसणार चाप?

गुरांढोरांसारखे प्रवास करणारे
केवढे ते सारे जीव
मुकी जनावरे पण करत
असतील का आपली कीव ?

जीव मुठीत धरून
करावा लागतो इथे प्रवास
न जाणे केव्हा
जीवाचा घेतला जाईल  घास

बुलेट ट्रेनच्या पैठणीचा
चढवू पाहत आहेत साज
पण सध्याच्या जीर्ण वस्त्राने
काढली आहे लाज

कसे रोखणार असे
आणखी नरसंहार?
काय म्हणावे याला
निकृष्ट प्रशासन कि
नियतीचा प्रहार


No comments:

Post a Comment