Friday, 10 January 2014

WhatsApp


WhatsApp ने मांडला आहे एक वैश्विक चव्हाटा 
साऱ्या तरुणाइने उचलला आहे यात खारीचा वाटा 

भ्रमणध्वनीच्या माध्यमातून साधला जातो संवाद 
कोणताच विषय याला ठरत नाही अपवाद 

खाता-पिता, ऊठता-बसता, वेळी-अवेळी 
या चव्हाट्याची  वाट असते कायम मोकळी 

जात-पात, वय, धर्म 
ठरत नाहीत अडसर 
मन असले खेळकर आणि तरुण 
कि किल्ला होऊन जातो सर 

छायाचित्र, ध्वनिफीत, चित्रफीत 
पाठवायची असते मुभा 
यामुळे येते गप्पागोष्टींना 
आगळी एक शोभा  

चव्हाट्यावर या 
खळखळून हसता येते
ढसाढसा  रडता येते,
खूप रागावताही येते
मुखवट्याच्या आडून सारे काही साधता येते    

एका समान धाग्यावर 
बनतात विविध गट 
कोणाला सामील करावे न करावे 
अशी कोणतीच नसते अट

SMS आणि Facebook ला मागे टाकणारी 
क्षणाला क्षणाला खुशाली कळवणारी 
परस्परांमधील अंतर कमी करणारी 
एकाच वेळी अनेकांशी संवाद साधणारी 
सतत भ्रमणध्वनीपाशी खिळवून ठेवणारी 

आहे कि नाही गंमतच न्यारी 
WhatsApp बनवणाऱ्यांची अनोखी अदाकारी